नगर: शहरातील ऐतिहासिक गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा येथे आज श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराज यांचा ३५९ वा प्रकाश गुरुपूरब (जयंती), वीर बाल दिवस तसेच साहिबजाद्यांच्या शहिदीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. या पावन सोहळ्यासाठी शीख, पंजाबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धार्मिक सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त यशवंत डांगे तसेच गुणे आयुर्वेद कॉलेज संस्थेचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी गुरुद्वारास भेट देत दर्शन घेतले.