नागपूर शहर: कोणताही पुरावा नसताना गुन्हे शाखेच्या पथकाने केले खून करणाऱ्या आरोपींना अटक : अभिजित पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 1 डिसेंबरला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीतील बिना संगम येथे खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे या प्रकणात कोणताही पुरावा नसताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली आहे.