पोलचे चोर कोण? या घोषणांनी महापालिका सभागृह दणाणले
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोंढवा भागातील रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे विद्युत पोल अज्ञातांनी कापून नेल्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवक आक्रमक झाले.
नगरसेवकांनी सभागृहाच्या मध्यभागी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. महिला नगरसेविकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. काही नगरसेवकांनी माईक हातात घेत प्रशासनाला जाब विचारला, तर इतर सदस्यांनी घोषणाबाजी करत त्यांना पाठिंबा दिला.
अध्यक्षीय आसनासमोर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज ठप्प झाले.
या प्रकरणाची चौकशी करून सभागृहाला माहिती देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन थांबवले.
पोल नेमके कोणी कापून नेले? या प्रश्नाचे उत्तर आता महापालिका प्रशासनाच्या चौकशीतून समोर येणार आहे.
#Pune #PuneMunicipalCorporation #PMC #PuneNews #PunePolitics PMCNews Kondhwa PuneCity Maharashtra MunicipalCorporation ThePublicNews
Haveli, Pune | Sep 10, 2026