दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहापूर भंडारा येथे शिवजयंती व पारंपरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर प्रह्लाद हरडे सर तसेच एनएसएस कार्यक्रम अधिकारी श्री दिलीप बोरकर उपस्थित होते. हा उपक्रम एनएसएस अंतर्गत आयोजित करण्यात आला असून, प्राध्यापक शीतल गमने ,दीपाली ईश्वरकर, अजय मोतीवाल, यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते