आज रविवारी दुपारी १२ च्या सुमारास महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी–भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार सुदेश कळमकर तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महाड येथील दर्गा तसेच श्री गांवदेवी जाकमाता मंदिरास भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.