पनवेल महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागातर्फे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिनांक आज ३ डिसेंबर, बुधवार २०२५ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कळंबोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. महापालिकेच्या वतीने मनपा क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. अशा पध्दतीने सर्वेक्षण करणारी पनवेल महापालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महापालिका आहे. या सर्वेक्षणांतर्गत सुमारे साडेतीन हजार दिव्यांग बांधवांची नोंद पालिकेकडे झाली आहे. अजूनही ज्या दिव्यांग बांधवाची नोंद पालिकेडे झाली नाही त्यांनी पालिकेकडे अधिकृत नोंदणी करावी.