वाईबाजार येथील वाघाई टेकडीनजीक राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रकला पाठीमागून दुचाकीच्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली असून अपघातानंतर जखमींना कोणते प्रकारची मदत वेळेवर मिळाली नसल्याने तब्बल अर्धा तास दोन्ही मृतक घटनास्थळावरच अक्षरशः तडतडून दोघांचाही मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून आज सांगण्यात आले आहे. माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर वायीबाजार येथील वाघाची टेकडी नजीक आज दुपारी घटना घडली आहे.