रावेर: हिंगोणा हंबर्डी दरम्यान दुचाकी ला अज्ञात वाहनाची धडक,दुचाकीस्वार गंभीर जखमी, फैजपूर पोलीस ठाण्यात दिली माहिती
हिंगोणा ते हंबर्डी जाणाऱ्या रोडावर दुचाकी क्रमांक एम. एच.१९ सी.एस.८५१० घेऊन अयुब बिस्मिल्ला तडवी हे जात होते. त्यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनाने रविवारी रात्री धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करण्यात आले व त्यांना जळगाव हलवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.