पालघर: डहाणू येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे करण्यात आले सामूहिक वाचन
संविधान दिनानिमित्त डहाणू येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.