येत्या दोन तारखेला भद्रावती नगरपरीषदेची निवडणुक होत असुन तीन तारखेला निवडणूक निकाल जाहिर करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर शहरात तिन डिसेंबर बुधवारला भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर तो पुर्ववत भरेल.याशिवाय शहरातील मतदान केंद्रांच्या शंभर मिटर परीसरातील आस्थापणा मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्यात आल्या आहेत.