जालना: समृद्धी महामार्गात बाधित शेतकर्यांचा संताप, देवमूर्ती येथे रास्ता रोको आंदोलन करुन रात्रभर रस्त्यावरच झोपले आंदोलक
Jalna, Jalna | Oct 15, 2025 समृद्धी महामार्गाच्या दुसर्या टप्प्यात जमिनी संपादित झालेल्या शेतकर्यांचा रोष अखेर उफाळून आला आहे. जालना जिल्ह्यातील सिंदखेड राजा महामार्गावरील देवमूर्ती येथे शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. दिवसभर आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलकांनी रात्रभर रस्त्यावर झोपूनच आंदोलन केलं. बुधवार दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या असून घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहे.