नागपूर शहर: अग्नि शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला करण्यात आली अटक : अभिजीत पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 27 सप्टेंबरला दुपारी 4 वाजून तीस मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला सामाजिक सुरक्षा विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कपिल नगर परिसरातून अटक केली आहे. आरोपीकडून एक बर्गमॅन दुचाकी व अग्निशस्त्र असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे.