सातारा: स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कलर फेकल्या प्रकरणी गृहमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे पोवइ नाक्यावर दहन
Satara, Satara | Sep 17, 2025 माँ साहेब या आमच्या नेहमीच आदर स्थानी आहेत, त्यामुळे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कलर फेकणाऱ्यांचा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या आदेशामुळे आम्ही सौम्य आंदोलन केला आहे, परंतु असे जर काही भ्याड कृत्य केली तर शिवसेना काय आहे हे आम्ही संपूर्ण जगाला दाखवून देऊ यावेळी गृहमंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख प्रताप जाधव दिली आहे.