टाकरखेड शिवारात अज्ञात चोरट्यांनी गोठ्यात घुसून एक म्हैस आणि दोन बकऱ्या असा सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली आहे.याप्रकरणी संतोष सुरेशसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.