भोकरदन: पारध पोलिसांनी केलेल्या मारहाणी संदर्भात पो.अधीक्षक यांची पो.अधीक्षक कार्यालयात भेट घेत महिलेने दिला आमरण उपोषणाचा इशारा
आज दि. 10 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5वाजेच्या सुमारास भोकरदन ता.जाळीचादेव येथील रहिवाशी असलेली महिला रेखा विजय गायकवाड यांनी जालना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची भेट घेऊन माहिती दिली आहे,की दोन एप्रिल रोजी तिच्या पतीला व तिच्या विधी संघर्ष ग्रस्त बालकाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व त्यांच्या सहकार्यांनी चोरीच्या संशयावरून मारहाण केली आहे, त्यामुळे 15 एप्रिल रोजी मी आमरण उपोषणाला बसत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करत आहे.