जालना: जालना जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणाची अपेक्षा
नव्या पोलीस अधीक्षकांसमोर कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान
Jalna, Jalna | May 3, 2026 जालना : जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून कायदा-सुव्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात खून, चाकूहल्ले, मारामाऱ्या, किरकोळ कारणांवरून होणारे वाद, दहशत निर्माण करणारे प्रकार यामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण भागातही गुन्हेगारी वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली