यशोधरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 19 जानेवारीला रात्री 8 वाजता दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाने 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या संपूर्ण कारवाईत लाखों रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.