पेण तालुक्यातील कणे-कोप्रोली खारबंदीच्या नूतनीकरणाच्या कामातील विलंब, निकृष्ट दर्जा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षा विरोधात ग्रामस्थांनी अभूतपूर्व आंदोलन करत खाडीत उतरून जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेल्या या कामा बाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागा कडून ठोस कारवाई न झाल्याने संतप्त नागरिक मोठ्या संख्येने कणे खाडी परिसरात एकत्र जमले.