दिग्रस: शहरातील वडवाला जीन परिसरात घंटीबाबा यात्रेला प्रचंड गर्दी उसळली
महान तपस्वी श्री घंटीबाबा पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी मंदिर परिसर ते लाठीवाला पेट्रोल पंपापर्यंत यात्रा भरवली जाते. मात्र यावर्षी वाहतूक व कायदा-सुव्यवस्था लक्षात घेता यात्रेचे ठिकाण वडवाला जीन परिसर निश्चित करण्यात आले. या वर्षी पूजा अम्युजमेंट आणि सुलतान अम्युजमेंट यांच्या वतीने यात्रेचे आकर्षक आयोजन करण्यात आले. यात्रेत २० हून अधिक पाळणे, “मौत का कुआ”सारख्या थरारक झुले, मुलांसाठी खास खेळणी, स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गृहउपयोगी वस्तू व आकर्षक दुकाने सजविण्यात आली होती.