जालना: जालन्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चाचे आयोजन; समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन
Jalna, Jalna | Jul 2, 2026 आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच समाजाच्या घटनात्मक आणि न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा रविवार, 21 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता जालन्यातील मुख्य मार्गावर काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी गुरुवार दि. 2 जुलै 2026 रोजी दु.1 वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.संयोजकांच्या माहितीनुसार, हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने नसून संपूर्ण समाजाच्या एकजुटीतून आयोजित करण्यात आली.