पुणे शहर: बस प्रवासादरम्यान महिलेकडून सोनसाखळी लंपास.
Pune City, Pune | Sep 17, 2025 पुणे शहर : ४७ वर्षीय महिलेची सोनसाखळी दोन अनोळखी महिलांनी बस प्रवासादरम्यान लंपास केली. फिर्यादी महिला कात्रज ते सोनवणे हॉस्पिटल या मार्गावर पीएमपीएमएल बसने प्रवास करीत होती. गर्दीचा फायदा घेत संशयित चोरट्या महिलांनी फिर्यादीच्या बॅगेतील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. घटनेची नोंद खडक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी महिलांचा शोध सुरू केला आहे.