आज दिनांक 12 जानेवारी संध्याकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांवर मतदान असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कोणत्याही पक्षाकडून पैसे वाटप अथवा आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक खबरदारी घेतली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी