संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेऊन ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याचा आमंत्रण दिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे साक्षरदार असलेल्या रायगडावर होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त करत शक्य तितक्या प्रमाणात उपस्थित राहण्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली