भंडारा: शहरातील गांधी चौकातील आनंद बारमध्ये बार मॅनेजरला काचेच्या ग्लासाने मारहाण; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा शहरातील गांधी चौकातील आनंद बारमध्ये थकीत पैशांवरून झालेल्या वादातून बार मॅनेजरवर काचेच्या ग्लासाने हल्ला करण्यात आल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० वाजता घडली. या घटनेत बार मॅनेजर जखमी झाला असून, भंडारा पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय चंद्रमनी फुलेकर (वय २६, रा. शास्त्री वॉर्ड, गणेशपूर) हे आनंद बार, गांधी चौक येथे बार मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. आरोपी आकाश अरुण स्वरोले (वय अंदाजे ३०, रा. मेंढा) आणि त्याचा एक अनोळखी मित्र (वय अंदाजे २४, रा. भंडारा).