जालना: भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; बालाजी मंदिर ते मस्तगड मार्गावर उत्साहाची लाट
Jalna, Jalna | Apr 19, 2026 भगवान परशुराम जयंतीनिमित्त जालना शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. कचेरी रोडवरील बालाजी मंदिरापासून मस्तगडपर्यंत काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत ब्राह्मण समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पारंपरिक वाद्यांचा गजर, भगवे झेंडे आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे संगमनेर येथून आलेले महाकाल अघोरी पथक होते. त्यांच्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पथकाच्या अनोख्या वेशभूषा व ढोल-ताशां