अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या वरिष्ठ समितीकडून बैलगाडा शर्यतींच्या शिस्तीमध्ये आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेमध्ये अधिक काटेकोरपणा आणण्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार बैलगाडा शर्यत सुरू होण्यापूर्वीपासून संपूर्ण शर्यतीदरम्यान कोणत्याही समर्थक किंवा गाडामालकाच्या हातात चाबूक, काठी किंवा अशाच प्रकारचे कोणत्याही वस्तू आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. नुकताच असा प्रकार ठाणे जिल्ह्यात बैलगाडा संघटनेच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने कठोर नियमावली जारी केली आहे.