शिरूर कासार: ओबीसी आरक्षण धोक्यात आल्यामुळे वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली
मराठा समाजामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचे म्हणत नैराश्येतून वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना शिरूर तालुक्यातील पाडळी येथे घडली.बबन तुळशीराम दुधाळ (वय ६०) असे मृताचे नाव आहे. मुलगा कृष्णा बबन दुधाळ यांनी दिलेल्या माहितीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.शिरूर कासार तालुक्यातील पाडळी या गावचे रहिवासी असलेले बबन दुधाळ हे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचे म्हणत