शिरूर कासार: ब्रम्हणात येळंब शहराला पुराच्या पाण्याने वेढले, हॉटेल दुकाना बस स्टॅन्ड पाण्यात गेले
शिरूर कासार तालुक्यातील ब्रम्हणात येळंब शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे गावातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला असून, त्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेतील दुकाने, हॉटेल्स आणि बस स्थानकात पाणी शिरले आहे. नागरिकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या असून, अनेक ठिकाणी पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले असून हॉटेलधारक आणि दुकानदारांना पावसामुळे मोठा फटका बसला आहे.