धामणगाव रेल्वे: पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत जाहीर, तालुक्यातील आठ गणासाठी आरक्षण निश्चित,गावगाड्यात राजकारणाला येणार वेग
धामणगाव रेल्वे,श येथील पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित झालं आहे.पंचायत समितीच्या गटाची आरक्षण सोडत आज १३ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात आल्याने आरक्षण निश्चित झालं आहे.आरक्षण निश्चित झाल्याने गावगाड्यात राजकारणाला वेग येणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून इच्छुकांनी केलेल्या तयारीला प्रत्यक्ष आता वेग येणार असून दिवाळीपासूनच आडाखे बांधण्यास सुरुवात होईल. पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत विविध गणासाठी २०२५ स आरक्षण सोडत करण्यात आली आहे..