जालना: विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात तक्रार; मौजपुरी पोलीस ठाण्यात सासरच्या लोकाविरांधात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | May 12, 2026 विवाहितेला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण तसेच दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार दि. 12 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आकाश कोळी रा. खांदा कॉलनी, सेक्टर-1, पनवेल, मुंबई, ह.मु. डुकरी पिंपरी, ता. जि. जालना यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.