उल्हासनगर: टाळ्या वाजवत आल्या नाही म्हणून उल्हासनगर मध्ये 3वर्षाच्या नर्सरीतील चिमुकल्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण,व्हिडिओ व्हायरल
उल्हासनगर मध्ये नर्सरीत शिकत असलेल्या एका तीन वर्षाच्या चिमूर्याला इंग्रजीत कविता शिकवताना टाळ्या वाजवता आल्या नाहीत म्हणून संतापलेल्या शिक्षिकेने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एकदा नाही दोनदा नाही ते तीन ते चार वेळा मध्ये फटके दिल्याचे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओ नंतर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घडलेल्या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. शिक्षकेविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.