भंडारा: धान उत्पादकांना दिलासा; रब्बी धान खरेदीसाठी मुदतवाढ, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ जाहीर केली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री डॉ. भोयर यांनी ही बाब थेट मुख्यमंत्री महोदयांकडे मांडली होती. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढ जाहीर केली. धान खरेदी प्रक्रियेतील अडचणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे निवेदन दिले होते. शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत पालकमंत्री भोयर यांनी हा मुद्दा शासनाकडे मांडला.