उमरी: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावपातळीवर बोंब मारो आंदोलन:शेतकरी संघर्ष समितीचेनिवेदन
Umri, Nanded | Oct 16, 2025 शासनाने जाहीर केलेली तुटपंजी मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात होणार आहे त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गाव पातळीवर दि. 17 ऑक्टोबर रोजी उमरी तालुक्यातील विविध गावच्या ग्रामपंचायतीसमोर सोयाबीन पिकाची आणि शासनाच्या निर्णयाची होळी करून बोंब मारो आंदोलन हे संध्याकाळी 7 च्या सुमारास करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज रोजी दुपारी 3 च्या सुमारास उमरी तहसील कार्यालय येथे देण्यात आले आहे