एसटी आगाराची आकर्षक योजना धार्मिक स्थळी नेणार सहल ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर लाडक्या बहिणींना फक्त लागणार अर्धे तिकीट योजना चा लाभ घेण्याचे साकोली आगाराचे आगारप्रमुख सचिन आगरकर यांचे आवाहन, एसटी संगे तीर्थाटन या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना धार्मिक स्थळी प्रत्येक आगारातून सहली नेल्या जाणार आहेत त्यासाठी जेष्ठ नागरिकांना म्हणजे 75 वर्षावरील नागरिकांना मोफत या धार्मिक सहलीमध्ये जाता येणार असून महिलांना फक्त अर्धे तिकीट लागणार आहे यासोबतच राहण्या खाण्याची माफक दरात सोय देखील एसटी आगार करणार आहे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन साकुरी आकाराचे आगारप्रमुख सचिन आगरकर यांनी केले आहे