बीड शहरातील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एका बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र, त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. ही बाब समजताच शिवसेना (युवासेना) चे मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव यांनी पुढाकार घेत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. राजपूत नावाच्या या बेवारस व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात बराच वेळ पडून होता. त्यावेळी जाधव यांना फोनवरून माहिती देण्यात आली. परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी विलंब न लावता तत्काळ तेथे धाव घेतली आणि अंत्यसंस्कार केले.