तुमसर तालुक्यातील परसवाडा येथे दि.१९ जानेवारी रोजी सायं. ४ वाजेच्या सुमारास फिर्यादी जितेंद्र भाऊराव मेश्राम हे आपल्या घरासमोरील अंगणात जनावरांना चारण्यासाठी उसाचे शेंडे तोडत होते यावेळी आरोपी विजय ताराचंद मेश्राम याने अचानक तिथे येत काहीही कारण नसताना जितेंद्र यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने जबर प्रहार करून त्यांना जखमी केले. यावेळी जखमी फिर्यादीच्या तक्रारीवरून व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून आरोपी विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.