जळगाव: बिलवाडीतील हाणामारी प्रकरणी तणाव वाढला; अंत्यसंस्कारापूर्वी आरोपींच्या घरांवर दगडफेक, जाळपोळ
बिलवाडी येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावात आणि जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना कठोर शिक्षेसाठी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात गोपाळ कुटुंबाने ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलकांनी मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यापूर्वीच संतप्त नातेवाईकांनी दुपारी ३ वाजता आरोपींच्या घरावर हल्ला करत दगडफेक आणि दुचाकी जळाली.