आज शनिवारी दुपारी १ च्या सुमारास मुरुड येथील राजपुरी ग्रामपंचायत आदिवासीवाडी येथील ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व नव्याने पक्षात सहभागी झालेल्या मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आणि पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीने प्रेरित होत ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षात सहभागी होत आहेत, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. आगामी काळात ग्रामीण स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम व व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला.