जालना: जालना बसस्थानकावर एसटी स्मार्ट कार्डच्या नावाखाली नागरिकांची लूट; जालन्यात गैरप्रकार उघड..
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालना बसस्थानकावर एसटी स्मार्ट कार्डच्या नावाखाली नागरिकांची लूट; जालन्यात गैरप्रकार उघड.. आज दिनांक 16 गुरुवार रोजी सकाळी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्मार्ट कार्ड योजनेच्या नावाखाली नागरिकांकडून अधिक पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात बसस्थानकावर उघडकीस आला आहे. शासनाने ठरवलेले शुल्क केवळ १९९ रुपये असताना प्रत्यक्षात नागरिकांकडून ३०० रुपये घेतले जात असल्याची तक्रार समोर आली आहे. जालना बसस्थानकावर स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणा