मानवत: पथदिवे दुरुस्त करताना नगरपालिका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्य,पाळोदी रस्त्यावरील घटना
वीज खांबावर पथदिवे दुरुस्त करण्यासाठी चढलेल्या नगर पालीका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मानवत शहरात 27 ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजता घडली. या प्रकरणी सायंकाळी सहाच्या सुमारास मानवत पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.