जळगाव: तरूणाच्या त्रासाला कंटाळून प्रौढाने राहत्या घेतला घरात गळफास; आरोपीला अटक करण्याची नातेवाईकांची मागणी, रूग्णालयात गर्दी
जळगाव शहराच्या नाथवाडा परिसरात गेल्या एक वर्षापासून एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून विजय उर्फ पिंटू हिरामण अहिरे (वय ४६) यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. नातेवाईकांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता केला आहे. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.