पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर राबवून शहरातील संघटित गुन्हेगारी आणि ड्रग्स तस्करांना मोठा धक्का दिला आहे. धोबी नगर आणि पाचपावली यासारख्या संवेदनशील भागात राबविलेल्या या कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दनानले आहे. पोलिसांनी आरोपींकडून बाराशे ग्राम गांजा जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.