भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे 1 नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी पवनी व तुमसर तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या. तुमसर येथे बोलताना पालकमंत्री भोयर यांनी भंडारा ते तुमसर महामार्गाची समस्या निकाली काढू. तसेच मागील १० ते १५ दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करू. असे आश्वासन पालकमंत्री भोयर यांनी रात्री 8 वाजता दिले.