औसा: अलमला-लातूर रस्त्यावर दुचाकीची पाठीमागून धडक, अजित लोकरे जखमी; अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल
Ausa, Latur | Nov 1, 2025 औसा -औसा तालुक्यातील अलमला ते लातूर रोडवर 28 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेअडीचच्या सुमारास झालेल्या अपघातात लातूरच्या संस्कृती नगर येथील अजित प्रल्हाद लोकरे हे जखमी झाले.लोकरे हे त्यांच्या मोटरसायकल (क्रमांक एमएच 24 बीयू 1705) वरून अलमला येथेून लातूरकडे जात असताना विश्वेश्वराया पॉलिटेक्निक कॉलेजच्या थोडे पुढे आले असता, अज्ञात मोटरसायकलस्वाराने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत लोकरे जखमी झाले.