जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: मोकळेपणाने बोला, प्रत्येक जीव मौल्यवान आहे
2.1k views | Washim, Maharashtra | Sep 10, 2025 वाशिम (दि.१०,सप्टेंबर): सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने १० सप्टेंबर – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त “मोकळेपणाने बोला, प्रत्येक जीव मौल्यवान आहे” असे आवाहन करण्यात आले.मानसिक आरोग्य समस्यांवर मोकळेपणाने चर्चा करून मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन विभागाने केले आहे. राज्य शासनाने नागरिकांना मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याचे, तसेच गरजूंनी आरोग्य केंद्रे, मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशकांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. समाजाने सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्मितीला हातभार लावावा, असेही आवाहन करण्यात आले.