5 नोव्हेंबरला रात्री नऊ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरात वन्यप्राणी आढळण्याचा घटना थांबायला तयार नाहीत. बिबट्या निलगा यासारखे प्राणी वारंवार शहरात दिसल्यानंतर आज चक्क एक जखमी कोल्ह्याला शहरात बघण्यात आले. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये कोल्ह्याच्या पायाला गंभीर जखम झाली असल्याची दिसत आहे. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.