भोसरीतील सावन आयबी ऑटो कंपनीच्या बसला ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस डोंगरावर आदळली. या अपघातात २७ कर्मचारी जखमी झाले असून ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सध्या माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत..