मुर्तीजापूर: तालुका क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या स्पर्धेत खेळाडूंची थाई बॉक्सिंग विभागीय स्पर्धेसाठी निवड...!
खेळाडूंची थाई बॉक्सिंग विभागीय स्पर्धेसाठी निवड...! मुर्तिजापूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला व जिल्हा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, मुर्तिजापूर येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे मार्गदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट व क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे तर तालुका क्रीडा मार्गदर्शक विनोद काळपांडे यांनी