नागपूर शहर: शहरात दिवाळी पण रात्रभर अग्निशमन विभाग मात्र ऍक्टिव्ह मोडवर, तब्बल 16 ठिकाणी अग्नीकांड
21 ऑक्टोबरला नागपूरकरांनी फटाक्याची जोरदार आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली परंतु 21 ऑक्टोंबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान नागपूर शहरात तब्बल सोळा ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहे. यामध्ये जास्तीत जास्त आग या फटाक्यामुळे लागल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान गणेश पेठ हद्दीत बाजार समिती कार्यालय राहुल हॉटेल येथे लागलेली आग विझवण्यात आली दरम्यान गणेश पेठ परिसरातच कार मध्ये देखील आग लागली होती