सडक अर्जुनी: माजी मंत्री स्व.महादेवरावजी शिवणकर यांच्या निवासस्थानी खा.प्रफुल्ल पटेल व आ.राजकुमार बडोले यांनी घेतली सांत्वन पर भेट
महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. महादेवरावजी शिवणकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आमगाव येथील निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार श्री. प्रफुलजी पटेल यांच्या सह माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी शिवणकर कुटुंबियांची भेट घेऊन स्वर्गीय श्री. महादेवरावजी शिवणकर साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आणि कटुंबियांचे सांत्वन केले.